मुंबई : दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलश रथावर भाजपच्या नेत्याचे फोटो सेशन व्हायरल होतंय. औरंगाबाद शहराचे उपमहापौर विजय औताडे यांचे हे फोटो आहेत. अस्थीकलश रथावर औताडे हास्य विनोदात रंगले. धम्माल करत सेल्फी काढत असल्याचे त्यांच्या फोटोत दिसतंय. आता हे फोटा व्हायरल झालेत.


सेल्फी सेलिब्रेशन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 श्रद्धांजली सभेत अटलजींचा अपमान केला म्हणून मतीनला मारहाण करण्यात विजय औताडे पुढे होते. आता सेल्फी सेलिब्रेशन करून औताडे महाशयांनी नक्की काय साजरं केला हाही प्रश्न आहेच. 


आरोप फेटाळले  


 दरम्यान भाजपच्या या भूमिकेवर एमआयएमनं सडकून टीका केलीय. एमआयएमच्या नगरसेवकांवर कारवाई केली आता भाजप औताडेंवर काय कारवाई करणार असं आव्हान जलील यांनी दिलंय. भाजपानं मात्र हे आरोप फेटाळलेत.