मुंबई : पिता पुत्राच्या सरकार मध्ये केवळ बालहट्टासाठी मेट्रो कारशेडसाची जागा बदलली जात आहे. त्याचा नाहक भुर्दंड जनतेला बसतोय, अशी टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली आहे. एक्स्पर्ट कमिटी बनवूनही याबद्दल निर्णय का होत नाही? असा सवाल शेलारांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे कारशेडसंबंधी बनवण्यात आलेल्या एक्स्पर्ट कमिटीचा रिपोर्ट आला का? काय रिपोर्ट आहे? सरकारने तपासला आहे का? काय निष्कर्ष आहे?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. रिपोर्ट दिला आहे आणि तो तपासला जात आहे, असं उत्तर मंत्र्यांनी दिलं आहे, असं आशिष शेलार म्हणाले.


एक्स्पर्ट कमिटीने आधी ज्याठिकाणी कारशेड होतं, त्याच ठिकाणी कारशेड असावं, असं सुचवल्याचं आमच्या कानावर आलं आहे. दुसरी जागा बघितली जात असल्यामुळे सामान्य जनतेला भुर्दंड बसत आहे. जे काम गतीने सुरु होते, त्याला रोखण्याचं काम महाविकासआघाडीचं सरकार करत आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.