मुंबई : हिंदू धर्माच्या वारसाशी बात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वयस्कर असलेल्या राज्यपाल यांच्याबाबत कशी भाषा वापरतात ? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री ठाकरे नाईट लाईफबाबत एवढ्या मिटिंग घेतात मात्र मंदिरबाबत लोकांच्या भावना समजत नाहीत का ? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे व्यवस्थेवर नियंत्रण राहिलेले नसल्याची टीका सोमय्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाहीये, मुख्यमंत्र्यांचे संतुलन राहिलेले नसल्याने त्यांना टेन्शन आल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपेक्स रुग्णालयात व्हेंटीलेंटरवर असलेल्या  ३८ पैकी १२ लोकांचे जीव धोक्याच्या पातळीवर आहेत. वीज पुरवठा बंद झाल्याने मुंबईत १२ हजार व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांपैकी किमान एक हजार रुग्णांचा जीव धोक्यात असूनस रकारने गंभीर नसल्याचे सोमय्या म्हणाले. 



तसेच यावेळी किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील आरोप केले. जितेंद्र आव्हाड यांनी एका एनजीओ आणि त्यांच्या व्यक्तीला एसआरए प्रकल्पाची पहाणी करण्याचे अधिकार दिले. त्या एनजीओ अंतर्गत एसआरएच्या बैठकाही झाल्या. हे नियमात बसत नसून हे एसआरएच्या सीईओने देखील मान्य केल्याचे सोमय्या म्हणाले. 


अशा प्रकारे वसुलीची नवीन व्यवस्था ठाकरे सरकारने केली असून वसुलीसाठी एजंटची व्यवस्था केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी मागणी सोमय्यांनी केलीय.