मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांचे(Kirit Somaiya) मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत मुख्य सचिवांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसंच किरीट सोमय्या यांनाही याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांचं आव्हान
याप्रकरणावर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत तुमच्यात हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा, कारवाई करा असं ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे.


माझे फोटो व्हायरल केले, गरीब कर्मचाऱ्यांना नोटीस दिली जात आहे, राजकीय भ्रष्टाचार करणारे तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. ज्यांनी फोटो काढले, व्हायरल केले, हे मुख्यमंत्री ठाकरे यांना माहित असताना त्यांच्यावर कारवाई केली नाही, पण विनाकारण नको त्या कर्मचाऱ्यांना भीती दाखवत कारवाई केली जात असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.


महापालिका , एमएमआरडीए, सचिन वाझे केस प्रकरणाच्या फाईल मी स्वत: पाहिल्या, मुख्यमंत्री कार्यालयातही फाईल याआधी पाहिल्यात, तिथे सगळीकडे फाईल पाहताना खुर्ची दिली गेली होती. खुर्ची ज्यांनी दिल्या त्या सगळ्या विभागांना नोटीस देणार का असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे.


आरटीआय अंतर्गत कोणालाही फाईल पाहता येते, हा नियम आहे. ठाकरे सरकारला घोटाळा बाहेर येईल याची भीती वाटते का? असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


मंत्रालयातील नगरविकास विभागात माहिती अधिकार अंतर्गत तपासणी करत असताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक तिथे कसे आले त्यांच्या सोबत कोण व्यक्ती होतं ज्यांनी फोटो काढले यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुन्हा दाखल करणार का प्रताप सरनाईक यांची चौकशी करणार का असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे 


सोमया हे नगर विकास विभागांमध्ये गेले असताना त्यांना खुर्चीत बसण्यास कशी दिली यावरून नोटिसा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी आज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन इथं सरनाईक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन इथं सोमय्या यांनी याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे. यासंदर्भात केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केल्याचे सोमय्या यांनी सांगितला आहे