मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बेनामी मालमत्तेची पाहणी केल्यावरून मुंबई पोलिसांनी किरीट सोमेया (Kirit Somaiya) यांना समन्स बजावलं होतं. त्याप्रमाणे आज किरिटी सोमय्या यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात हजेरी लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांनी कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. आज माझ्यासोबत 20 ते 25 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात स्टेटमेंट घेण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी प्रॉपर्टी हे आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


आता छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता घोटाळा किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता, त्यानंतर दोन वर्ष जेलमध्ये गेले. छगन भुजबळ यांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राला लुटणार आणि किरीट सोमय्या थांबणार असं होणार नाही, उद्धव ठाकरेंनी एक नाही हजारवेळा मला जेलमध्ये टाकलं तरी किरीट सोमय्या गप्प बसणार नाही असं आवाहन किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. 


मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती, की किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकणार म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


काय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा, कोविड हॉस्पीटलचा घोटाळा करणारा, संजय राऊत आणि त्यांचा पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. जे हजारो लोकांच्या जीवाशी खेळले त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, पण ज्यांनी घोटाळे बाहेर आणले त्यांच्यावर कोविड नियमांचा भंग केल्याचं दाखवून उद्धव ठाकरे किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल होतोय हे दुर्देव आहे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.


माझ्यावर रोज आरोप होत आहेत, पण एकही कागदपत्र देऊ शकलेले नाहीत. ब्लॅकलिस्टेड लाईफ लाईनवर उपमुख्यमंत्री अजित पवार का गुन्हा दाखल करत नाहीत. मुख्यमंत्री तर घरातून बाहेर पडत नाहीत अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली आहे.