मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किरीट यांचे पुत्र नील सोमय्या यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. जुन्या खंडणी प्रकरणात त्यांची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका जुन्या खंडणी प्रकऱणात त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान या संदर्भात नील सोमय्या यांची चौकशी केल्यानंतर मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गेल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आपली कुठलीही चौकशी झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात झाला आहे. जुन्या खंडणी प्रकरणात नोंदवला जबाब नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणी आता नील यांची नव्यानं चौकशी करण्यात आली. त्यामुळे आता नील यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


नील सोमय्या यांनी देखील आपली चौकशी वैगरे काही झाली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटण्यासाठी गेल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तर दुसरीकडे नील यांच्या चौकशी प्रकरणी वडील किरीट सोमय्या यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.