मुंबई :  शिवसेना खासदार (Shiv Sena) संजय राऊतांना (Sanjay Raut Bail) अखेर जामीन मंजूर झालाय. पीएमएलए कोर्टानं (Pamla Court) त्यांना दोन लाख रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर केलाय. हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीनं पीएमएलए कोर्टाला केली होती. पण ही मागणी फेटाळल्याने संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 100 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती. या सर्व घडामोडीदरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलंय. (bjp leader mohit kamboj tweeted after shiv sena leader sanjay raut gived bail in patra chawl scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊतांच्या सुटकेनंतर कंबोज यांनी ट्विट केलं. 'लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पडेगा', असं ट्विट करत कंबोज यांनी राऊतांना नाव न घेता इशारा दिला आहे. त्यामुळे आता कंबोज यांच्या ट्विटला राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. सोबतच राऊतांच्या सुटकेनंतर आता राजकारण तापणार इतकं मात्र निश्चित झालंय.