मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनं सारं कलाविश्व हादरलं. सुशांतनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं पण, त्यामुळं अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं. खुद्द सुशांतच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या प्रेयसीविरोधात एफआयआर दाखल करत आता सीबीआय चौकशीसाठीही मागणी केली आहे. या सर्व प्रकरणी आता भाजप नेते नारायण राणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूतनं आत्हमत्या केली नसून, त्याची हत्या करण्यात आली आहे असा दावा राणे यांनी मंगळवारी मुंबईत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. शिवाय अभिनेता दिनो मोरिया याच्या घरी झालेल्या पार्टीवरही राणे यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. दिनोच्या घरी मंत्र्यांचं रोज येणंजाणं असतं. हे मंत्री येथे करतात तरी काय, बरं त्याच्या घरी आलेले तीन- चार तासांमध्ये सुशांतच्या घरी जातात. सुशांतचं घर हे दिनोच्या बंगल्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. हा दिनो मोरिया आहे तरी कोण, अशा चढ्या स्वरात राणेंनी सवाल केला. 


दिनो मोरियाच्या घरी येणारे हे मंत्री कोण आहेत हे सर्वजण जाणतात असं म्हणत राणे यांनी सूचक विधान केलं. शिवाय पोलीस अधिकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत राणेंनी नव्या विषयांना चालना दिली. 



दिशा सॅलिअनची बलात्कारानंतर हत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप


मृत्यूपूर्वी सुशांतला धमक्या येत होत्या, तो दररोज सिमकार्ड बदलत होता; मुळात पोलिसांनाही याची कल्पना होती, असा धक्कादायक खुलासा करत राणेंनी सर्वांचं लक्ष वेधलं. आता नारायण राणेंनी केलेला हा खुलासा आणि त्यातही दिशा सॅलिअन या सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या आत्महत्येप्रकरणीसुद्धा त्यांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरत आहे.