दिशा सॅलिअनची बलात्कारानंतर हत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

हे सरकार गुन्हेगारांना वाचविण्यासाठी....

Updated: Aug 4, 2020, 04:44 PM IST
दिशा सॅलिअनची बलात्कारानंतर हत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जवळपास गेल्या पन्नासहून अधिक दिवसांपासून अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकणाचा तपास सुरु असतानाही त्याप्रकरणी हाती आलेल्या अपयशावर भाजप नेते नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिदषेमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणासोबतच त्याची एक्स मॅऩेजर दिशा सॅलिअन हिच्या मृत्यूबाबतही धक्कादायक खुलासा केला. 

सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वीच पाच दिवस आधी दिशानं आत्हमत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्यामुळं आता या दोन्ही घटना एकमेकांशी जोडल्याही जात आहेत. याच मुद्द्यावर प्रशासनाची भूमिका आणि मुंबई पोलिसांची कारवाई पाहता राणे यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. 

दिशा सॅलिअन हिची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचं म्हणत तिच्यावर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राणेंनी केला. काही अहवालांचा संदर्भ देत त्यांनी ही बाब माध्यमांपुढे मांडली.

'दिशा सॅलियन हिनं आत्महत्या केली नाही, तर ही हत्या आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी का केली नाही. बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आली कारण तिच्या गुप्तांगांवर जखमा असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळं याकडे का दुर्लक्ष केलं गेलं'?, या शब्दांत राणेंनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजीचा सूर आळवला. हे सरकार गुन्हेगारांना वाचविण्यासाठी आहे असा सूर आळवत त्यांनी निरपराध मुलींवर अत्याचार करून खून करण्याचे लायसन सरकारला दिलेले नाही म्हणत काही धक्कादायक खुलासे केले.