मुंबई : अर्णब गोस्वामीला अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामीला आज अलिबागच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. रस्तेमार्गाने अर्णब गोस्वामीला अलिबागच्या दिशेने नेण्यात आले आहे. मुंबईहुन अर्णबला घेऊन पोलिसांची टीम  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग क्राईमब्रांचला घेऊन जाणार आहे त्यानंतर न्यायालयात हजर करणार. या प्रकरणाचे आता राजकीय वर्तुळातही पडसाद पडत आहेत. 


राजकीय वर्तुळातून आलेल्या प्रतिक्रिया 


अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे हिटलरशाहीच्या राज्याचा कळस. हा महाविकासआघाडी सरकारने आणि खास करून शिवसेनेने गाठला आहे. -भाजप आमदार अतुल भातखळकर



काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस... महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने? भाजप नेते आशिष शेलार



किरिट सोमय्या - ठाकरे सरकारच्या काळात पोलीस राज, सरकार आणि सोशल मीडिया एक्टिविस्ट्स याची निंदा करतो. अर्णब गोस्वामीला ज्या प्रकारे अटक केली त्याची किंमत मोजावी लागेल. 



केशव उपाध्ये



अर्णब गोस्वामी यांना अटक केल्या प्रकरणात भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र आघाडी सरकारवर खास करून शिवसेनेवर टीका केला जीत आहे.