मुंबई : मुंबईत हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याप्रकरणी बॉयफ्रेन्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्स करताना गर्लफ्रेन्डचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हॉटेलमध्ये सेक्स करताना गर्लफ्रेन्डचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना येत आहे, म्हणून पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती, तेव्हा तरूणी मृतावस्थेत असल्यासारखीच होती, पण पोलिसांनी तिला तातडीने हॉस्पिटलला हलवलं, पण डॉक्टरांनी देखील तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तिचा मृतदेह इस्त्राईलला नेण्यात आला होता.


टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हे दोघे हॉटेलमध्ये सेक्स करत असताना त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. ही हत्या तर नाही ना? असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला होता.


हे प्रकरण मागील वर्षी मार्च महिन्यातील आहे. ओरिरन याकोव हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. कुलाबा भागात हे एका हॉटेलमध्ये थांबले. सेक्स करताना ओरिरनच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला होता. 


मात्र फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार, ओरिरन याकोव याच्या सोबतच्या २० वर्षीय गर्लफ्रेंडचा मृत्यू सेक्स करताना गुदमरून झाला होता. ओरिरन याकोव याने सेक्स करताना गर्लफ्रेंडचा गळा दाबला होता. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याला अटक करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या


गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्ड, ब्रेक अप, पॅच अपसाठी अॅप ...


तुमची गर्लफ्रेन्ड अगदी अशीच वागते, पाहा