मुंबई : राजकारणात नेतृत्वाच्या लांगुलचालनाची परंपरा मोठी आहे. नेमके हेच सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडू लागले आहे. ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सावध होण्याची वेळ आहे का, अशी शंका आता विचारली जाऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही काळात चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांकडे नजर टाकल्यास याची प्रचिती येऊ शकते. या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट देवाशी केली आहे. 


नेत्याच्या दैवतीकरणाचा हा तसा नियमित तामिळ पॅटर्न. कधी इंदिरेला दुर्गा म्हणल्याने देश पातळीवर गाजलेला आणि आता महाराष्ट्रात फडणवीस समर्थकांना गुदगुल्या करणारा. पण, जोखमीचाही. कारण अशाने, फडणवीसांना देवत्व बहाल केले जात असले तरी इतर जण जबाबदारीपासून नामनिराळे राहतात. 


फडणवीस म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, हीच सवय अंगवळणी पडते. त्यामुळे यश-अपयशाचे सर्व खापर देवेंद्र फडणवीसांवरच फोडले जाते. 


देवेंद्रांना देव ठरवून विरोधकांना दानव ठरवले जाऊ शकते. पण, विरोधक आहेत कुठे? पक्षाबाहेर की पक्षात?, हाच मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.