अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : सत्ता गेल्यानं प्रदेश भाजपचं कमळ कोमेजलं गेलं आहे. शिस्तीचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपमध्ये सध्या काही आलबेल नसल्याची चिन्हं आहेत.  उत्तनमधल्या भाजपच्या चिंतन बैठकीनंतरची देवेंद्र फडणवीस यांची ही पतंगबाजी....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चा होती की फडणवीसांनी बैठकीत कुणाची कन्नी कापली याची. कारण सध्या भाजपचा पतंग उडण्यापेक्षा एकमेकांच्या कन्न्या कापण्याचेच प्रकार जास्त सुरू असल्याची चर्चा आहे. 


सत्ता गेल्यानंतर पक्षात नाराजी नाट्यही मोठ्या प्रमाणात समोर आलं आहे. त्यावरही जे. पी. नड्डांबरोबरच्या बैठकीत चर्चा झाली. 



एक कोटी सदस्य म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये साध्या जिल्हा स्तरावरील संघटनात्मक निवडणुक प्रक्रिया पुर्ण झालेल्या नाहीत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची नेमणुक नव्याने केली जाणार होती तीही रखडलीय.


देशात सर्वात शिस्तीचा पक्ष म्हणून भाजप पाठ थोपटवून घेतो. मात्र सत्ता गेल्यावर प्रदेश भाजपमध्ये मरगळ आणि नैराश्य दिसतंय. आता नड्डांनी झाडाझडती घेतल्यावर भाजप पुढची पावलं काय टाकणार, याची उत्सुकता आहे.