Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (mumbai municipal corporation election 2022)  भाजपने (BJP) नवा मास्टर प्लॅन (Master Plan) आखलाय. शिंदे गट (Shinde Group)  आणि मनसे (MNS) यांची युती होणार अशी सूत्रांची माहिती आहे. तर मनपा निवडणूक भाजप एकटी लढणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने हा मास्टरप्लॅन केलाय. शिवसेनेची (Shivsena) मराठी मतं फोडण्यासाठी शिंदे गट आणि मनसे (Shinde Group MNS Allaince) एकत्र येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर भाजप, शिंदे गट आणि मनसेचे मोठं आव्हान असेल. मनसेला सोबत घेतलं तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फाटका बसू शकतो. यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मनसे पालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत. त्याचाच भाग म्हणजे आज राज ठाकरे (Raj Thackeray) वर्षावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. 


राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नाशिक प्रमाणेच आता विदर्भातही (Vidarbha) पक्षवाढीवर भर दिला आहे. विदर्भात शिवसेनेचा मतदार हा सहजासहजी भाजपाला मतदान करणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेवर नाराज असलेल्या मतदाराला मनसेकडे वळवण्याचा राज ठाकरेंना प्रयत्न आहे. 


विदर्भात एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद कमी करण्यात भाजपाला यश आलं आहे. आता राज ठाकरे हे 13 सप्टेंबरला नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.