मुंबई : 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड मध्ये भाजपचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे भाजपकडून विजयाचा जल्लोष सुरु झाला आहे. देशात ठिकठिकाणी भाजपकडून विजय साजरा होत असताना मुंबईत देखील भाजपकडून जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपचे अनेक नेते यावेळी भाजप कार्यालयात पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'बोरूबहाद्दर आणि युवराज गोवा-गोरखपूरमध्ये गेले. बदल आणू म्हणाले. गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत. नोटाला जेवढी मत आहेत त्या पेक्षा कमी मत शिवसेनेला मिळाली आहेत.'


'शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले. लाईट गुल झाली. आता मुंबईत ही परिवर्तन होणार. यांची लाईट गुल होणार आहे. मोदी है तो मुमकीन है, मुंबईत ही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार.' असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं आहे.


Goa Election Result 2022 ( दुपारी 4.30 वाजेपर्यंत)


गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप 20, काँग्रेस 12, महाराष्ट्र गोमंतक पक्ष 2, आप 2 आणि तृणमूल काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.