मुंबई : 'मोदी मुक्त भारत करण्याआधी' मनसे 'राज ठाकरे यांनी मनसेमुक्त महाराष्ट्र केला' आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे.


भाजप आमदाराची टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातलं भाषण म्हणजे पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


ज्यांनी नगरसेवक पळवले त्यांच्यावर टीका नाही, पण भारत मोदी मुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय, असंही अतुल भातखळकर म्हणाले.


भारत मोदी मुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजीपार्कवर केलेल्या भाषणात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मोदीमुक्त भारत करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं.