मुंबई : कंगना प्रकरणावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. कंगना काय बोलली वगैरे हा वेगळा मुद्दा असून नियमाने कारवाई करावी, असं ते म्हणाले. कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुंबईत जे काही बेकायदेशीर आलं आहे, हे शिवसेनेमुळे आलं आहे, अनेक बांधकामं ही बेकायदेशीर आहेत. ज्यांनी काल हक्कभंग आणला ते सरनाईक त्यांची ठाण्यात किती बांधकामे आहेत ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


शरद पवार थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; कंगना वादावर बैठक


शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा 50 टक्के मराठी लोकसंख्या होती. आता एका मतदारसंघातून मराठी माणूस निवडून येईल अशी परिस्थिती नाही. मराठी माणूस कुठे आहे? या परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे.


दरम्यान, सुशांतसिंहची आत्महत्या नसून खून आहे. कोणाचा तरी या प्रकरणाशी संबंध आहे. मातोश्री उडवण्याचं नाटक असून सुशांतसिंग प्रकरण दाबायचं आहे. असं काय सुशांत सिंह प्रकरण आहे ज्यामुळे ठाकरे कुटुंब भयभीत झालं आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.