Maharashtra Politics, Advay Hire joined Shiv Sena : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जबरदस्त खेळी केली आहे. भाजपच्या बड्या नेत्यालाचा शिवसेनेने आपल्या गळाला लावले आहे.  भाजपचे अद्वय हिरे ( BJP Nashik leader  Advay Hire) यांनी शिवसेनेत प्रवेश (joined Shiv Sena) केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कॅबिनेटमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी खेळण्यात आली आहे (Maharashtra Politics). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे अद्वय हिरे मालेगावमध्ये कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना टक्कर देणार आहेत. अद्वय प्रशांत हिरे हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते आहेत. मालेगावात हिरे यांचा दाडंगा जनसंपर्क आहे. याचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच प्रवेश केला आहे. याचा भाजप आणि शिंदे गटाला जबरदस्त फटका बसणार आहे. 


भाजपा नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर आज हिरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेल्या मातोश्री येथे हिरे हातावर शिवबंधन बांधून घेतले. उद्धव ठाकरेंनी हिरे यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं. मालेगावमध्ये कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून ही खेळी खेळण्यात आली. अद्वय हिरे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.


कोण आहेत अद्वय हिरे ?


अद्वय हिरे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. तसंच जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते चेअरमन आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवक आणि पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आता हे नुकसान अद्वय हिरे कसं भरुन काढणार, याकडे लक्ष लागले आहे.