मुंबई : ट्विटरवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला ट्विटरवरची टिव टिव भोवली आहे. ट्विटरवर बदनामीकारक लेखन केल्याबद्दल या पदाधिकाऱ्याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीतेन गजारीया असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते.


व्यावसायिक भागीदारी - मारवाडी आणि गुजराती. हॉटेल्स आणि बार - पंजाबी आणि शेट्टी, एसटी नोकऱ्यांमधून निलंबन - मराठी, हीच अस्मिता का?


काल शिवसैनिक मला बाहेरचे म्हणून शिवीगाळ करत असताना त्यांच्या मातोश्रीवरच्या साहेबांनी गुजराती उद्योगपतींना 3 नवीन कंत्राटे दिली आणि त्यांनी या सैनिकांना काय दिले? अस्मिताचा लॉलीपॉप? असे ट्विट जीतेन गजारीया यांनी केले होते.  


यासोबतच त्यांनी रश्मी ठाकरे आणि अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते. या लिखाणाबद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तक्रार दाखल करून घेत जीतेन गजारीया यांना ताब्यात घेतलं. 


दरम्यान, सायबर सेलने याप्रकरणी भाजपचे सोशल मीडिया प्रभारी यांनाही नोटीस पाठविली आहे.