आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर `ही` जबाबदारी
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे.
BJP on Election : आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून भाजपचे (BJP) राज्यातील 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर (Madhya Pradesh) आहेत. भाजपच्या आमदारांकडे तेलंगणा (Telangana), मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली असून, आजपासून मध्य प्रदेशमधून या दौऱ्याला सुरुवात झालीय. पुढील आठवडाभर भाजपचे हे आमदार (BJP MLA) मध्य प्रदेशमध्ये असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या राज्यात हे आमदार जातील. सलग 7 दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची 'शाळा' घेतली जाणार आहे. सकाळी 7 पासून ते रात्री 7 पर्यंत प्रत्येक आमदारावर अॅपद्वारे करडी नजर देखील ठेवली जाणार आहे..
मध्य प्रदेशमध्ये कोण कोणत्या जिल्ह्यात जाणार
1) जयकुमार रावल - नागोद विधानसभा - जिल्हा - सतना
2) मंगेश चव्हाण - कसरावद विधानसभा - जिल्हा - खरगोन
3) देवयानी फरांदे - देवास विधानसभा - जिल्हा - देवास
4) संजय कुटे - नेपानगर विधानसभा - जिल्हा - बुऱ्हाणपूर
5 रणधीर सावरकर - भैंसदेही विधानसभा - बैतुल
6) राम शिंदे - जुन्नारदेव विधानसभा - छिंदवाडा
7) रणजित सिह मोहिते पाटील - अमरवाडा विधानसभा जिल्हा छिंदवाडा
8) श्वेता महाले - जबलपूर पश्चिम विधानसभा - जबलपूर जिल्हा
9) नितेश राणे - बछीया विधानसभा - मण्डला जिल्हा
10) प्रवीण दरेकर - जबलपूर कैन्ट विधानसभा - जबलपूर जिल्हा
मध्य प्रदेशमध्ये काय करणार आमदार
मध्य प्रदेशमध्ये जिल्हा-जिल्ह्यात विधान सभा स्थरिय बैठक घेतली जाणार आहे. याशिवाय विचार परिवार समनवय बैठक, लाभार्थी संपर्क अभियान, विधान सभा स्थरिय अनाथलय भेट. वृद्धाश्रम दौरा, युवकांसोबत बातचीत, सोशल मीडिया चर्चा, पत्रकार परिषदा आणि मंडल स्थरिय बैठक घेतली जाणार आहे.
भाजप कार्यकर्ते आक्रमकठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री फडणवीसांवर (Devendra Fadanvis) खालच्या भाषेत टीका केल्यावर आता भाजप कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळलीय. सामनाविरोधात मुंबईत जागोजागी आंदोलन (Protest) करण्याचा इशारा देण्यात आलाय. भायखळा स्टेशनबाहेर सामनाची प्रत जाळण्यात आलीये. तर भाजप युवा मोर्चाकडून नरीमन पॉईंट इथे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. फडणवीसांवरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सामना विरोधात तक्रार करून राज्यभर आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर बावनकुळेंना का मिरच्या झोंबल्या असा सवाल राऊतांनी विचारला.