मुंबई : अभिनेता सोनू सूदने मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी मदत केली आहे. यामुळे सगळ्याच स्तरावर सोनू सूदचं कौतुक होतंय. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्वतःही करायचं नाही @Sonu Sood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म?' असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. 



दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की,'संपूर्ण  महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या' असं म्हणत संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.  (सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत) 



सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.