मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत, असे सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दावा खोडून काढला. युतीच्या जागावाटपाचे अंतिम सूत्र अजूनही निश्चित झालेले नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शिवसेना भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. त्यानंतर भाजपकडून गिरीश महाजन यांनी असे काहीही ठरलेले नाही, असे स्पष्ट केले.  शिवसेना आणि भाजपाचा अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री राहील, असा दावा कदम यांनी केला आहे. 


तसेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे, अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. शिवसेनेवर भाजप दबाव टाकण्याचा प्रश्नच नसल्याचे कदम म्हणालेत. त्यामुळे युतीबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.