मुंबई : विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. मुंबईतील वसंतस्मृती इथे ही बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रदेश कार्यकरणीची विजयानंतरची ही पहिली बैठक आहे


.पक्षाची सदस्य नोंदणी हाती घेण्यात आली आहे. सदस्य नोंदणीत उच्चांक गाठावा, असा निर्धार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कोणाचा हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत भाजपमध्ये चर्चा सूरु आहे. दोन टर्म प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा अध्यक्ष करत नाही, ही भाजपची परंपरा आहे. शेतकरी आत्महत्या ही शरमेची गोष्ट आहे. मात्र त्या रोखण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.