उद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, पण भाजप.... चंद्रशेखर बावनकुळे यांचा जबरदस्त निशाणा
मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे
Uddhav Thackeray vs BJP: शिवशक्ती भीमशक्ती(Shivshakati bhimshakati) युतीच्या अनुषंगाने सकारात्मक हालचाली पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतसोबत युती करण्यास सकारत्मकता दर्शवली आहे. या युतीवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(BJP state president Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात. पण, कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे लगावला आहे.
मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे. बेळगाव बाबत नरमाईची भूमिका नाही , सर्वोच्च न्यायालयात केस आहे, संयमाने दोन्ही सरकारने काम केलं पाहिजे असं देखील बावनकुळे म्हणाले.
आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजपा युतीचाच विजय होईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाण्यास सज्ज आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाकरेंना आता सोबत हवीच, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी दिली. तर लोकहितासाठी ही युती होत असल्याचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.