मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना जबाबदार आहे. स्पष्ट जनादेश असूनही शिवसेनेमुळे सरकार येऊ शकले नाही, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेना-भाजपला जनादेश असल्याने लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, ही भाजपची इच्छा होती. परंतु, मित्रपक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर केल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असे त्यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची सत्ता स्थापन करायचीय, कामाला लागा; फडणवीसांची राणेंवर जबाबदारी




यावेळी त्यांनी पुन्हा एकदा युती तुटण्यास शिवसेनेला जबाबदार ठरवले. आम्ही आजपर्यंत कोणत्याही पर्यायाचा शोध घेतला नाही. मात्र, आमच्या मित्रपक्षाने सुरुवातीपासूनच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. इतरांचा पाठिंबा मिळत असल्याचा आव आणणारेही ते असमर्थ ठरले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज कोणत्याही शिवसेना नेत्याची भेटही घेतली नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.