मुंबई : Maharashtra Assembly Speaker Election : हिवाळी अधिवेशन (Winter session) वादळी ठरणार याचे संकेत मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकरण्यासाठी भाजपकडे आयते मुद्दे हाती मिळाले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचा उमेदवार देणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तर दुसरीकडे कॉंग्रेसही आपला उमेदवार देणार आहे. संग्राम थोपटे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच सरकारची कसोटी लागणार असून, अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. एसटी संप, परीक्षा घोटाळा, महिला प्रश्न, ईडी धाडी, शेतक-यांचे प्रश्न यावर विरोधक घेरण्याच्या तयारीत आहेत...तसेच विधानसभा अध्यक्षपदाचीही निवडणूक होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सहभागी होणार आहेत. सर्व मुद्द्यांवर विरोधक घेणार असल्याने सरकारला मुकाबला करावा लागणार आहे.


अधिवेशनात सरकारला ओबीसी आरक्षणाचा जाब विचारणार, सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती ठरली आहे. तर तर मुख्यमंत्री चहापानाला उपस्थित राहणार आहेत. 'झी २४ तास'ने उजेडात आणलेल्या शिवभोजन थाळी घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या सोईसाठी ही योजना असल्याचा आरोप करत शिवाजी महाराजांचं नाव आहे तिथं भ्रष्टाचार या सरकारला चालतो का, असा सवालही फडणवीसांनी केला आहे. 


ओबीसी आरक्षणाप्रकरणी सरकारला अधिवेशनात विरोधक जाब विचारणार आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय. त्यामध्ये सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलीय. शेतक-यांना न मिळालेली मदत, परीक्षा घोटाळा अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारची कोंडी करणार आहेत.