मुंबई : ६ एप्रिलला भाजप मुंबईमध्ये पक्ष स्थापना दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी बिकेसीवर आयोजित कार्यक्रमात राज्यभरातून ३ लाखपेक्षा जास्त कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला भाजपाने 'भारत महाभाजप - महामेळावा' असे नाव दिले असून पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


२०१३ ला नरेंद्र मोदी यांची पक्षातर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर भाजपाने मुंबईत बीकेसी मैदानावर 'महागर्जना' रॅली घेत शक्तीप्रदर्शन केले होते. 


निवडणुकीला अवकाश असतांना पक्ष स्थापना दिनाच्या निमिताने शक्तीप्रदर्शन करत नेमका कोणाला काय इशारा दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असेल.