मुंबई : BJP New Concept Marathi Katta आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation elections) आतापासून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. भाजपने आता मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवी खेळी केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरु झाली आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपची एक नवी संकल्पना आहे.(BJP's new concept for the upcoming Mumbai Municipal Corporation elections)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता भाजपने 'मराठी कट्टा'  (Marathi Katta) नवी संकल्पना पुढे आणली आहे. मराठी मतदार अधिक जवळ यावेत यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.


भाजपची ही नवी संकल्पला पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून 'मराठी कट्टा'  (Marathi Katta) संकल्पनेला सुरूवात होणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.


पक्षाचे आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे 'मराठी कट्टा' आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईतील मराठी भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यानुसार चेंबूर घाटला व्हिलेज येथे पहिला 'मराठी कट्टा' आयोजित होणार आहे.


मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्यायावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजप या संकल्पनेतुन करणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.


महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्याची मुंबई भाजपची ही खास व्युहरचना असणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.