मुंबई : उत्तर प्रदेश, गोव्यातील दिग्विजयानंतर भाजपनं आता आपलं लक्ष मुंबई महापालिकेकडे केंद्रीत केलंय. जल्लोषानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार आशिष शेलार यांनी तसे संकेत दिलं. पोपटाचा प्राण महापालिकेत आहे. त्यामुळे आता पुढलं टार्गेट मुंबई असेल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं, तर गोव्यातील विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच महापालिकेतील रणनीतीचे चाणक्य असतील, असं शेलार यांनी जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड मध्ये भाजपचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे भाजपकडून विजयाचा जल्लोष सुरु झाला आहे. देशात ठिकठिकाणी भाजपकडून विजय साजरा होत असताना मुंबईत देखील भाजपकडून जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपचे अनेक नेते यावेळी भाजप कार्यालयात पोहोचले आहेत.


भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'बोरूबहाद्दर आणि युवराज गोवा-गोरखपूरमध्ये गेले. बदल आणू म्हणाले. गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत. नोटाला जेवढी मत आहेत त्या पेक्षा कमी मत शिवसेनेला मिळाली आहेत.' असं शेलार यांनी म्हटलंय.


 'शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले. लाईट गुल झाली. आता मुंबईत ही परिवर्तन होणार. यांची लाईट गुल होणार आहे. मोदी है तो मुमकीन है, मुंबईत ही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार.' असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं आहे.