मुंबई : ब्लू व्हेल गेम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याप्रकरणी फेसबुक आणि गुगल दोन्ही संस्थांना मुबंई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने पाठवलेली नोटीस काल म्हणजे बुधवारी फेसबूक आणि गुगलच्या भारतातील पत्यांवर मिळाली असल्याने उत्तर देण्यास दोन्ही संस्थांनी वेळ मागून घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फेसबूक आणि गुगलची बाजू मांडण्यांना फटकारल. 


"इथं मुलांचे जीव जातायेत तरी त्याबाबात तुम्ही गंभीर नसल्याचं दिसतंय. असं कोर्टानं म्हटलंय. "त्यानंतर लवकरात लवकर आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणात आज मुंबई सायबर सेल आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायच होतं. मात्र सायबर सेल आणि राज्य सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे याबाबत सरकार किती गंभीर आहे हे देखील समोर आलय.