मुंबई : पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेने या परिसरातील पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी काही कामे हाती घेतली आहेत. पण ही कामं पूर्ण करण्यामध्ये महानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेची दिरंगाई अडथळा ठरत असल्याचा आरोप मुंबई महापालिकेनं केलाय. 


पहिल्या टप्प्यात किती काम


हिंदमाता इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर ब्रिटीशकालीन बंदिस्त ड्रेनेजचं काम सुरु आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीचा आकार वाढून पाणी जलदगतीनं मुख्य पर्जन्य जलवाहिनीमध्ये जाण्यास मदत होणार आहे. ७०० मीटरपैकी पहिल्या टप्प्यात २०० मीटरचं काम पावसाळ्यापूर्वी होण्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये आता महानगर गँसचा धीमा कारभार अडथळा ठरत आहे. 


बीएमचीचा चार वर्षांपासून पाठपुरावा


गॅस वाहून नेणा-या १२ इंच आकाराची वाहिनी तात्काळ शिफ्ट करणं गरजेचं असतानाही महानगर गॅस प्रशासन काहीच हालचाल करत नाहीये. तर दुसरीकडं इतर सर्व युटीलीटीज शिफ्ट करण्याचं काम संबंधित प्रशासनाकडून सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण पाहून तर धक्काच बसेल. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत रुळांशेजारच्या ब्रिटीशकालीन ३ पर्जन्य जलवाहिनींचे रूपांतर बॉक्स ड्रेनेजमध्ये म्हणजे ओपन कलवर्टमध्ये करण्यासाठी बीएमसी गेल्या ४ वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. 


केवळ ३१ मीटरच्या कामासाठी ४ वर्षांचा कालावधी घेवूनही हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. दोन महिन्यांपूर्वी केवळ खड्डा तेवढा खोदून ठेवला आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूकडील बीएमसीच्या हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी मोठी झालीय. पण रेल्वे हद्दीतील काम झाले नसल्यानं परेल ब्रीजखाली पाणी दरवर्षी तुंबून राहते.