मुंबई : 1 मेपासून राज्यासह देशभरातील लसीकरण केंद्रातून (Vaccination Cent 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण होणार आहे. देशात विक्रमी लसीकरणाचा रेकॉर्ड करणारे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government Makes Record of Vaccination) देखील या मोहिमेसाठी सज्ज झालंय. दरम्यान मुंबई पालिकेने  (BMC) यासाठी कंबर कसली असून खासगी केंद्रांनी लसीकरणासाठी पालिकेकडे अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा व मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता होणं गरजेचं आहे. ही पूर्तता पूर्ण करु शकणाऱ्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी पालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केलंय.  त्यानंतर सदर खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी कोविन पोर्टलवर होईल. खासगी केंद्रांनी काय काळजी घ्यावी याचे निर्देशदेखील जाहीर करण्यात आलीय. 



काय काळजी घ्यावी ?


प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.


लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.


लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.


लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलंय. 


विक्रमी लसीकरण 


राज्यात 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण झाले होते. पण आज राज्याने 5 लाखांचा टप्पा आलोंडला आहे. त्यामुळे मुख्ममंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी सर्वांते अभिनंदन केले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखाहून अधिक जणांचं लसीकरण झालं आहे. (Corona Vaccine)


राज्यात आज रोजी 6155 लसीकरण केंद्र आहेत. ज्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचं याआधी अभ्यासात पुढे आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घेणं महत्त्वाचं आहे.