Rutuja Latke Andheri Bypoll Election  : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा (Andheri Bypoll Election ) मार्ग मोकळा झाला आहे. आज त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. (Rutuja Latke Resignation Case )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court)  काल सुनावणीच्यावेळी लटके  यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारवा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश  दिले होते. त्यानुसार  मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आज सकाळीच ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला. त्यानुळे ऋतुजा लटके यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 


काल मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर  उद्धव ठाकरे यांची भेट घेत आनंद व्यक्त केला. यावेळी लटके यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते, मला न्यायदेवतकडून न्याय मिळाला आहे. आपण पतीचा वारसा पुढे नेणार आहोत. राजीनामा मंजूर झाल्याची प्रत मिळाल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी यावेळी  स्पष्ट केले होते.  त्यामुळे त्या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 


 दरम्यान, ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. दरम्यान, 12 ऑक्टोबर 2020 रोजी  ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते.