मुंबई : आपल्या 6 नगरसेवकांनी असं का केले हे आपल्याला माहित नाही, एवढ्या मोठ्य़ा प्रमाणात नगरसेवक निर्णय घेतात, म्हणून पक्षाला वाईट वाटतं, असं म्हणत, नगरसेवक फुटीमागे आपल्याला-पक्षाला काहीही माहित नसल्याचं, मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर म्हणत होते. 


आणि बाळा नांदगावकर हे काय बोलून गेले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी 24 तास'शी बाळा नांदगांवकर हे दूरध्वनीवरून बोलत होते, मात्र बाळा नांदगावकर बोलण्याच्या ओघात बोलून गेले, 'एवढ्या मोठ्या पक्षाला आमची मदत घ्यावीच लागली ना' आणि या एकाच वाक्यावरून, हा मनसेचा मास्टर स्ट्रोक असल्याचं दिसून येत आहे.


भाजप-शिवसेनेत सुंदोपसुंदी


मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू होण्याआधी, दोन्ही मित्रपक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. मनसे अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत करून भाजपचे मनसुबे उधळून लावत असल्याचं दिसत आहे. हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.


मनसेकडून अप्रत्यक्ष भाजपची कोंडी


मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती लागू न देण्याची काळजी मनसेनेही घेतली असावी. सत्तेच्या लक्ष्मण रेषेबाहेर भाजपला ठेवण्यासाठी, मनसे शिवसेनेला मदत करत असल्याची पाल सर्वांच्याच मनात चुकचुकतेय. पण एकाच वेळी मनसैनिक आणि शिवसैनिक सोशल मीडियावर खुश होत आहे.