BMC Bharti: मुंबई पालिकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.या रिक्त पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिका भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 690 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांचा समावेश आहे. या भरती अंतर्गत महिला, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू यांच्यासाठी काही जागा आरक्षित आहेत. प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. याच्या तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांना नोटिफिकेशन पाहावे लागेल. 


या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 250 जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदाच्या 130 जागा, दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाच्या 233 जागा, दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) पदाच्या 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.


अर्जाची शेवटची तारीख


मुंबई पालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला 11 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर अर्ज करावा. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


TATA कडून विविध पदांची भरती जाहीर  


टीआयएफआरमध्ये सायंटिफिक ऑफिसर, अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, सुपरव्हायजर कॅन्टीन, क्लर्क, वर्क असिस्टंट, प्रोजेक्ट सायन्टिफिक ऑफिसर, ट्रेड्समन ट्रेनी वेल्डर, ट्रेड्समन ट्रेनी फिटर या जागांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून आयटीआय/ बारावी/ ग्रॅज्युएशन/ बीई/ बीटेक/ कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ हॉटेल मॅनेजमेंट इ. मध्ये मास्टर्स केलेले असावे. उमेदवार भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पात्रतेशी संबंधित तपशील देण्यात आला आहे. याच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 26 ऑक्टोबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवार TIFR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.