मुंबई : मुंबई महापालिकेचा २०१८-१९ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.


कोणतेही नवीन कर नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ हजार २५८ कोटी रूपयांचा हा अर्थसंकल्प असून यातून मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. कोणतेही नविन कर प्रस्तावित केलेले नाहीत. जे आधीचे कर आहेत ते कायम असतील.


ही नक्कीच मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. स्थायी समितीत आयुक्तांनी बजेट स्थायी समिती अध्यक्षांना सादर केले.


अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये


- कोस्टल रोडसाठी १५०० कोटी


- गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १०० कोटी


- रस्त्यांसाठी २०५८ कोटी


- ओसी नसलेल्या पुनर्वसित इमारतींना जलजोडणी दिली जाणार 


- या बजेटमध्येही तोट्यातील बेस्टसाठी ठोस आर्थिक तरतूद नाहीच. उपाययोजना राबवल्यावरच भांडवली खर्चाकरीता मदत देणार. 


- नविन विकास आराखडा अंमलबजावणीसाठी २६६५ कोटींची तरतूद


- नविन पूल बांधणीसाठी ४६७ कोटी


- १४५० मँनहोलवर जाळ्या बसविण्यासाठी १.२२ कोटींची तरतूद


- ५५ ठिकाणच्या पूर प्रवण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ५३.७१ कोटींची तरतूद


- मिठी नदी सुधारणेसाठी १५ कोटी


- कोणतीही करवाढ नसली तरी पालिका रूग्णालयातील शुल्क वाढणार आहे. तसंच कारखाना परवाना शुल्क, घाऊक बाजार  शुल्क वाढणार


- देवनार डंपिंग ग्राऊंड इथं कच-यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी ११० कोटींची तरतूद


- मुलुंड डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ६५ कोटींची तरतूद


- उद्यान विभागासाठी २४३ कोटींची तरतूद


- तानसा पाईपलाईन शेजारील सायकल टृँकसाठी १०० कोटींची तरतूद


- मलनि:सारण सुधारणांसाठी ११९ कोटींची तरतूद


- रस्त्यांसाठी २०५८ कोटींची तरतूद असून त्यातील सिमेंट रस्त्यांसाठी ४३४ कोटी तर डांबरी रस्त्यांसाठी ५९० कोटींची तरतूद