मुंबई : रस्त्यावरील खड्यांवरून टिकेची झोड उठलेल्या मुंबई महानगरपालिकेने मागील दीड महिन्यात आलेल्या तक्रारींपैकी १४९७ खड्डे बुजविण्यात दावा केला आहे. पालिकेने खड्याच्या तक्रारींच्या निराकरणासाठी सुरू केलेल्या संकेतस्थळावर दीड महिन्यात १६४२ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी १४९७ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या वतीने कोर्टात देण्यात आली आहे.


रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका केली असून बुधवारी न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.