मुंबई पालिकेचा २५६९ कोटींचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महापालिकेचा २०१८-१९ वर्षाचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेचा २०१८-१९ वर्षाचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण समिती सदस्यच उपस्थित नसल्याने १२ वाजता सादर होणारे बजेट उशिरा सादर झाले. २५६९ कोटी रूपयांचे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे.
पहिल्यांदाच घडले हे...
बजेटच्या दिवशीही वेळेवर उपस्थित राहण्याचे गांभीर्य सर्वच राजकीय पक्षांच्या समिती सदस्यांमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब ज-हाड यांच्या सर्व प्रशासन सदस्यांची वाट पाहावी लागली. असा प्रकार मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच झालाय. १२ वाजता एकही शिक्षण समिती सदस्य हजर नव्हते.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
- पालिका शाळांचे आता खाजगीकरण...बंद पडलेल्या ३५ शाळांच्या इमारतींमध्ये खाजगी लोक सहभागाने ( PPP) तत्वावर ३५ शाळा सुरू करणार. इथं CBSE, IB, Igcse, ICSE च्या शाळा असतील....यात सीएसआर निधीला मान्यता दिलीय
- शाळांमध्ये सँनिटरी नँपकीन वेंडिंग मशिन बसविण्यासाठी २.५ कोटी रूपयांची तरतूद
- २४ विभागात २४ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करणार, यासाठी २५ लाखांची तरतूद
- सेमी इंग्लिशच्या ६४९ शाळा सुरू करणार, सध्या ५८ शाळा आहेत
- विद्यार्थी मोफत बस प्रवासासाठी ६५ कोटी तरतूद
- टँब साठी १८ कोटी
- शालेय इमारती दुरूस्ती, पुनर्बांधणी २७७ कोटी
- डिजिटल क्लासरूम ३७ कोटी