कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांच्या दिवाळी बोनस संदर्भात कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झाली आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोनसचा निर्णय जाहीर करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामगार संघटनांनी २० हजार रूपये बोनसची मागणी केली होती. वर्षा बंगल्यावर मुंबई मनपा कर्मचारी संघटना समन्वय समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. एक लाख मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनस सानुग्रह अनुदान बाबत या बैठकीत चर्चा झाली. कर्मचारी संघटना समन्वय समिती आणि पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्यात बैठक झाली होती, पण निर्णय होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रश्न गेला होता.


मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह बोनस देण्यात आला होता. 2 वर्षाआधी 14,500 रुपये बोनस देण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यंदा अधिक बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. यंदा 20 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.