मुंबई:  मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना शनिवारपर्यंतची डेडलाईन दिली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना यासंदर्भात सक्त ताकीद दिली. या डेडलाईनमुळे कंत्राटदारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. मुंबईत मागील महिनाभरात रस्त्यांवर 1032 खड्डे पडले होते. त्यातील 674 खड्डे बुजवण्यात आले असून अद्याप 358 खड्डे शिल्लक आहेत. हे खड्डे शुक्रवारी व शनिवारी य़ा दोन दिवसांत कंत्राटदारांना बुजवाय़चे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मात्र, तसे न झाल्य़ास संबंधित कंत्राटदारांना नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. खड्डे भरण्यासाठी पालिकेने यंदा स्वत: 297.99 टन कोल्डमिक्स तयार केले आहे.