Maharashtra Shinde Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज आपत्ती व्यवस्थापन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई, कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थानन विभागाच्या बैठकीत मुंबई आणि राज्यातील पावसाचा आढावा घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) उपस्थित होते.  तसंच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सर्व विभागीय आयुक्तही या बैठकीला हजर होते.


तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला माहिती दिली. पावसाळ्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर काय उपाययोजना केल्या आहेत, ट्रेन बंद पडू नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. कोकणाचा विचार केला तर भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. या घटनांवर काय उपाययोजना केल्यात याचा आढावा घेण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भातल्या सर्व सूचना केल्या आहेत. एखादी आपत्ती टाळता येणं शक्य नसतं पण त्याला मदत तात्त्काळ मिळेल यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. 


मुंबईत पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडतात, अशा इमारतींना नोटीस दिल्यानंतरही मुंबई महापालिका कारवाई करत नाही, त्यामुळे आयुक्तांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत, की जिथे इमारत कोसळेल आणि नोटीस दिली नसेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर कारवाई केली पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अति धोकादायक इमारतीतल्या लोकांसाठी तात्पुरता निवारा उभारुन त्यांनी तिथे नेता येईल का यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.