मुंबई : ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे.


दादर चौपाटीवरची सर्व दुकानं हटवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षतेसाठी दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बीएमसी प्रशासनानं बंद केले आहेत. तसंच खबरदारी म्हणून दादर चौपाटीवरची सर्व दुकानं हटवण्यात आली आहेत.


दादर चौपाटीवर जाण्यास मनाई


तर, ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी आंबडेकरांच्या अनुयायांनाही दादर चौपाटीवर जाण्यास मनाई करण्यात येणार आहे. मात्र, अनुयायांना चैत्यभूमीवर जाता येणार आहे.


७० शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था 


ओखी वादळ आणि पावसामुळे परिस्थिती बिकट झाल्यास मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांची ७० शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. 


तसंच नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफसह मुंबई महापालिकेचा आपतकालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात आला आहे.



तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.