BMC Recruitment : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे.  मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. येथील रिक्त पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.  यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असू पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन येथील लोकमान टिळक रुग्णालयात ‘स्वच्छता निरिक्षक’(Sanitation Inspector)  पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


सॅनिटायझेशन इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे आहे. सॅनिटायझेशन इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. 


Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, 'येथे' पाठवा अर्ज


स्वच्छता निरिक्षक पदासाठी उमेदवारांनी आपले अर्ज  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आवक / जावक विभाग, शीव येथे पाठवायचे आहेत. 25 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्वच्छता निरिक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना  दरमहा 25 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.


मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज


भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती (https://drive.google.com/file/d/1rm6fp1pTkZWese0DVKQ-GBYkMtxb9m2E/view?usp=sharing) या लिंकवर देण्यात आली आहे.


दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी


एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना परवाना दिला जाणार आहे. उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी 50 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रुपये भरावे लागतील. एजंट पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. 


इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.  16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड,आधार कार्ड (मूळ प्रत आणि 1 झेरॉक्स), 3 फोटो आणि अन्य 3 महत्वाचे दस्तावेज आणणे गरजेचे आहे.