मुंबई : देशात लसीचं उत्पादन मागणी पेक्षा कमी असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता थेट रशियन सरकारलाच स्पुतिनिक-व्ही लस देण्याची विनंती केली आहे. रशियन सरकारच्या आरडीआयएफ या बाहेरच्या देशामध्ये लस विक्री करणा-या संस्थेस बीएमसीने पत्र लिहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल टेंडर भरण्यासाठी उद्या अंतिम मुदत आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं एका आठवड्यानं मुदत वाढवली होती. सध्या स्पुतनिक व्हीच्या ४ वितरक कंपन्यांनी निविदा भरण्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला असला तरी तो थेट उत्पादक कंपन्यांकडून मिळालेला नाही.


वितरक कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात लस देऊ शकतील का? याविषयी पालिकेला शंका आहे. त्यामुळे, आता महापालिकेनं थेट रशियन सरकारलाच लस देण्याची विनंती केली आहे.


मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी रशियन सरकारच्या आरडीआयएफ या बाहेर देशामध्ये लस विक्री करणा-या संस्थेस पत्र लिहून 1 कोटी स्पुतनिक लसीचे डोस देण्याबाबत मागणी केली आहे. तसंच त्याची किंमत कळवून थेट पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. यासंदर्भात मुंबईतील रशियाचे राजदूत यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे.