मुंबईच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी पूर्ण, कठोर कारवाईची शिफारस
मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी १०० अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झालीय.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी १०० अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झालीय. दोषी कर्मचा-यांवर कठोर कारवाईची शिफारस या चौकशी अहवालात करण्यात आलीय. त्यामुळे अनेक दोषी अभियंत्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील ३४ रस्ते घोटाळ्यात अडकलेल्या कर्मचा-यांच्या चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आलाय. तर दुस-या टप्प्यातील २०० रस्ते घोटाळ्यातील १७० अधिकारी आणि कर्मचा-यांचीही चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे.