मुंबई : मुंबई महापालिकेने अतिधोकादायक इमारतींच्या बाबतीत मोठं पाऊल उचललं आहे. पालिकेने नोटीस देऊन ही गेल्या तीन महिन्यांत घरं रिकामी न करणाऱ्या 154 इमारतींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलं आहे.दरम्यान, पालिकेने आतापर्यंत 148 धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. ज्यांनी घरं रिकामी केली आहेत त्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात.मुंबईत अतिधोकादायक स्थितीत असलेल्या 407 इमारती आहेत. यापैकी 98 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत, तर 21 अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याची प्रक्रिया करण्याआधी तांत्रिक सल्लागार समितीचा सल्ला घेतला जाणार आहे.


मुंबईतील 53 अतिधोकादायक इमारतींचे प्रकणर न्यायप्रविष्ट आहेत, तर 81 इमारती तांत्रिक कारणामुळे रिकाम्या करण्यात आल्या नसून या इमारातीतील वीज आणि पाणी कनेक्शन अद्याप तोडण्यात आलेलं नाही.


महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.