मुंबई : कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय. कमला मिल आणि रघुवंशी मिलमधील अनधिकृत पब, रेस्टॉरो आणि हॉटेल्सवर पालिकेची कारवाई सुरु आहे. सकाळपासूनच या मिल परिसरातल्या अनधिकृत हॉटेल्स, पब, रेस्टॉरोवर बुलडोजर फिरवण्यात येतोय. 
 
पण, हीच तत्परता पालिकेने आधी का दाखवली नाही? अग्निकांडांसारख्या घटना घडल्यावरच पालिकेला जाग का येते? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अनधिकृत बांधकामांवर कारवाई


शुक्रवारी आगीच्या घटनेनंतर या मिल परिसरातल्या हॉटेल, पबच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलीय. कमला मिल, रघुवंशी मिलमधील स्काय व्ह्यू आणि सोशल हॉटेल तर रघुवंशी मिल कंपाउंडमधील पनय फ्युम्स तसंच शिशा स्काय लाउंजच्या अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आलीय.


मरीन ड्राईव्हवरील विल्सन, पारशी , कॅथलिक आणि इस्लामिक जिमखान्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात आलीय.


विशेष पथक कार्यरत


यासाठी पालिकेच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आलीय. अशाच प्रकारची कारवाई पालिकेच्या के पश्चिम विभागाकडूनही करण्यात येतेय. 


जुहूच्या रॅमी गेस्टलाईन या अनधिकृत रुफ टॉप पबवर महापालिकेचा हातोडा पडलाय. ही कारवाई दिवसभर सुरु राहणार आहे.