मुंबई: मुंबईतील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने येत्या १५ दिवसांत महालक्ष्मी रेसकोर्ससह अन्य ठिकाणी कोरोना केअर सेंटर (सीसीसी २) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईतील रुग्णालये अपुरी पडत आहेत. मात्र, नव्या कोरोना केअर सेंटर्समुळे आणखी २१ हजार ७०० बेडस् उपलब्ध होतील. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु विज्ञान केंद्र, बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान, माहिम निसर्गोद्यान आणि गोरेगाव नेस्को येथे ही सेंटर्स उभारली जातील. यापैकी बीकेसी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे दाटीवाटीच्या भागातील कोरोना संशियतांना इतरांपासून वेगळे ठेवता येईल.


मोठी बातमी: मुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी



सीसीसी- 2 म्हणजे काय?
सीसीसी- 2 म्हणजे ज्यांच्यात लक्षणे आढळत नाहीत परंतु जे कोरोना संक्रमित आहेत आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यांना या नव्याने उभारल्या जाणाऱ्या कोरोना केअर सेंटर-2 मध्ये ठेवले जाईल. यात नवीन सुविधेमुळे सीसीसी २ अंतर्गत सध्याची १४ हजार खाटांची क्षमता वाढून ३४ हजार इतकी होणार आहे.तसेच लक्षणे असलेल्या गंभीर रुग्णांसाठी आणखी १७५० खाटा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या ३ हजारांवरुन ४७५० वर जाईल.

यामध्ये नायर, केईएम, सेव्हन हिल्स रुग्णालयासोबत वरळीतील एनएससीआय येथील मोबाईल आयसीयू बेडस् देखील उपलब्ध असतील.मुंबई महापालिकेने आतापर्यंत १ लाख कोविड चाचण्या केल्या आहेत. सहा सरकारी प्रयोगशाळा व ११ खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून या चाचण्या झाल्यात. मुंबईतील कोविड चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह रूग्ण आढळण्याचा दर १० टक्के इतका आहे. तर एकूण रुग्णांपैकी बरे झालेले रुग्ण २१ टक्के असून मृत्युदर ३.९ % इतका आहे.