मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या दीवार या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा तो प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला आठवतोय, 'आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है तुम्हारे पास क्या है?' अमिताभ बच्चन यांचा हा डायलॉग प्रचंड गाजला होता. पण आता अमिताभ बच्चन यांना आज मेरे पास बंगला है, पर बंगले को दीवार नही है, असं म्हणण्याची वेळ येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं कारण आहे, अमिताभ बच्चन (amitabh bacchan) यांच्या मुंबईतील प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीचा काही भाग पाडला जाणार आहे. जुहूमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ही कारवाई केली जाणार आहे. 45 फुटांचा संत ज्ञानेश्वर मार्ग 60 फूट करण्याचा मुंबई प्रयत्न आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरण केलं जाणार आहे. रस्ता रुंदीकरणासाछी 2019 मध्ये 'प्रतिक्षा'च्या (pratiksha) आसपासच्या काही इमारतींच्या कंपाऊंडचा भाग तोडला होता. पण त्यावेळी 'प्रतिक्षा' बंगल्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. या कारवाईवरुन अमिताभ बच्चन यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आली नाही. 


जुहू येथील एन. एस. रस्ता क्रमांक 10 इथून चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर नेहमी वाहतूककोंडी होते. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. परिसरातील वाहतूककोंडीचा फटका स्थानिक नागरिक तसंच पादचाऱ्यांना बसतो. त्यामुळे पालिकेने 45 फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे 60 फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम बरेचसे पूर्ण झाले आहे. पण अजून काही जागेची आवश्यकता आहे. या मार्गावर असलेल्या 'प्रतीक्षा' बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवण्यात आली होती.