मुंबई : आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं आहे. त्यासाठी मुंबई पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. गिरगाव चौपाटीवर दक्षिण आणि मध्य मुंबईतील नागरिक गणपतीचं विसर्जन करत असतात. त्यासाठी येथे पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जुहू आणि दादर चौपाटीवरदेखील विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे.


कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. तसंच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहीत सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मुंबईत एकूण ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. तर ३१ कृत्रिम विसर्जन स्थळं आहेत.